Saturday, November 10, 2012

राजर्षी छत्रपती शाहू महाराज

Rajarshi Chatrapati Shahu Maharaj

राजर्षी  छत्रपती शाहू महाराज 


Rajarshi Shahu Maharaj

Birth Date - 26 June 1874
Birth Place - Kagal (Kolhapur)
Name - Yashwantrao Jaisingrav Ghatge (यशवंतराव जयसिंगराव घाटगे)
Death - 6 May 1922 (Mumbai)

* कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च  1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले.
* 28 वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.

* 1891- श्रीमंत लक्ष्मीबाईसाहेब  यांच्याशी विवाह झाला

 महाराजांचे शिक्षण - *1885 ते 1894 या काळात शैक्षणिक कार्य पूर्ण केले
*1894 सर फ्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली धारवाड येथे शिक्षण घेतले
*1898 पर्यंत राजकोट येथे Principal McNoton यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले.


* 2 एप्रिल 1894 रोजी राज्याभिषेक समारंभ झाला.
*1894 - राजे झालेनंतर लगेचंच त्यांनी बहुजन समाजातून तलाठ्याच्या नेमणुका करण्याचा अध्यादेश काढला
व वेठबिगाराची पद्धत बंद केली.
* 1895 साली मोतीबाग तालीम सुरु केली. शाहू महाराजांना कुस्ती हा खेळ आवडत असे. याच वर्षी शाहूपुरी गुळाची व्यापार पेठ सुरु केली.
* 27 मार्च 1895 - पुणे येथील फर्गुसन महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे  उद्घाटन केले.
* 1887 - आळते महार स्कूल ची स्थापना केली, दुष्काळ पिडीत शेतकऱ्यांना कर्ज दिले.
* 1899 - वेदोक्त प्रकरण याच वर्षी घडले. तेंव्हापासून ब्राम्हणांच्या मक्तेदारीस शह देण्यासाठी आणि त्यांच्याकडून बहुजनांची होणारी गळचेपी थांबवण्यासाठी बहुजन उद्धाराचे कार्य हाती घेतले. वेदोक्त प्रकरणात ब्राम्हणांचे समर्थन केले.
* 1901 साली मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी 'व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग' या बोर्डिंग ची स्थापना कोल्हापुरात केली. याच वर्षी नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वसतीगृहाची स्थापना केली. तसेच गोवध बंदी कायदा केला.
* 20 जुलै 1902 रोजी संस्थानामध्ये नोकरी मध्ये 50% आरक्षण देण्याचा आदेश काढला. 
* 9 नोव्हेंबर 1906 रोजी 'किंग एडवर्ड मोहमेडन एज्युकेशन सोसायटी' ची स्थापना कोल्हापूर येथे केली. तसेच शाहू मिल तथा 'शाहू स्पिनिंग अंण्ड विव्हिंग मिल' ची सुरुवात केली.
* 1907 सहकारी तत्वावर कापड गिरणी सुरु केली. अस्पृश्य समाजातील विद्यार्थ्यांसाठी 'मिस क्लार्क बोर्डिंग हाउसची' स्थापना केली.
* 1908 बॉंबस्फोट घडवून महाराजांना मारण्याचा अयशस्वी प्रयत्न समाजकंटकांकडून केला गेला.
* 1910 जहागीरदारांचे अधिकार कमी केले
* 11 जानेवारी 1911 साली कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. अध्यक्ष म्हणून परशुराम घोसटवाडकर तर प्रमुख म्हणून भास्करराव जाधव हे काम पाहत. याच वर्षी विद्यार्थ्यांना 15% नादारी देण्याची घोषणा केली.
 -शिक्षकांसाठी प्रशिक्षण देण्याची योजना व गुणवत्तेनुसार पदोन्नती देण्याची योजना सुरु केली.
 -कोल्हापुरात राधानगरी तालुक्यात भोगावती नदीवर राधानगरी धरण बांधले.
 -सत्यशोधक समाजाचे अधिवेशन पुणे येथे भरवले

* 1912 - खासबाग मैदान या कुस्ती मैदानाची सुरुवात कोल्हापूर येथे केली. (याला 2012 साली 100 वर्षे पूर्ण झाली).
      - सहकारी कायदा केला व  सहकार चळवळीला प्रोत्साहन दिले.
      -सत्यशोधक समाजाचे अधिवेशन नाशिक येथे भरवले
*1913 गाव तिथे शाळा असावी असा अध्यादेश काढला. पाटील शाळांची सुरुवात केली.
      -कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाळा सुरु केली.
* 1916 साली संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले
      -बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी 'डेक्कन रयत शिक्षण संस्थे'ची स्थापना निपाणी या ठिकाणी केली.
      -आर्य समाजाची तत्त्वे याच वर्षी स्वीकारली.
* 1917 विधवांच्या पुनर्विवाहास कायद्याने मान्यता दिली
      - 25- जुलै पासून संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले.
* 1918 आंतरजातीय  विवाहास कायद्याने मान्यता दिली
      - कुलकर्णी व महार वतने रद्द केली.
      - जमिनी रयतवारीने कसण्यास दिल्या
      - आर्य समाजाची शाखा कोल्हापुरात सुरु करून राजाराम कॉलेज या संस्थेकडे चालवण्यास दिले.
      - गुन्हे गारी जमातीच्या लोकांची पोलीस हजेरी बंद केली.
      -  तलाठी शाळा सुरु केल्या.
 * 1919 - स्त्रीयांवर होणाऱ्या अन्यायांविरुद्ध कठोर कायदा केला.
      - एप्रिल 1919 - कानपूर - "अखिल भारत वर्षीय कुर्मी क्षत्रिय महासभा" या संस्थेच्या 13 व्या  
        अधिवेशनात त्यांच्या अतुल्य कार्याबद्दल "राजर्षी" पदवी बहाल करण्यात आली.
      - शाळेत अस्पृश्यता पाळण्यास मनाई करणारा कायदा केला.
 * 1920 - घटस्फोटाचा कायदा करण्यात आला
       - देवदाशी प्रथा कायद्याने बंद करण्यात आली
       - हुबळी - "ब्राम्हणेतर सामाजिक परिषद" चे अध्यक्षपद भूषवले
       - पूजाअर्चा शिकाऊ उमेदवाराकडून करावी असा आदेश काढला
 *  6 मे  1922 रोजी मुंबई येथे निधन.

 
*********************************************************************************


Some Important Questions on Shahu Maharaj:

1. Shahu Maharaj Born On ____, in _____?
A. Jun 26, 1974, kolhapur
B. June 24, 1976, Kagal
C. July 24, 1974, Kanpur
D. July 26, 1976, Mumbai

2. Shahu Maharaj Started "Victoria Maratha Bording" in ______
A. Nashik
B. Kagal
C. Mumabi
D.Kolhapur

3. When Shahu Maharaj Started Branch of "satyashodhak samaj" in kolhapur?
A. 12 February, 1912
B.  03 March, 1920
C.  24 September, 1906
D. 11 January 1911

9 comments:

  1. plese think and check before you wrote something about Shahu maharaj...please check the ...Education of maharajara..date is wrong..
    महाराजांचे शिक्षण - *1985 ते 1894 या काळात शैक्षणिक कार्य पूर्ण केले...please correct it as soon as possible

    ReplyDelete
  2. pleasee translate to hindi language

    ReplyDelete
  3. Shahu maharanjavar bomb attack kelta hi mahiti khuthch nahi ,tx for new info.

    ReplyDelete