Saturday, November 10, 2012

महात्मा जोतिबा फुले

Mahatma Jotiba Phule

महात्मा  जोतिबा फुले 

  • Birth Date - 11 April 1827
  • Birth Place - Vanavadi (pune)
  • Village - Katgun (Satara)
  • Original Surname - Gorhe
  • Death  - 28 September 1890
* गोर्हे कुटुंबीय फुलांचा व्यवसाय करत असल्यामुळे त्यांचे आडनाव बदलून फुले असे ठेवण्यात आले.
* लहूजी साळवे यांचेकडून दांडपट्टा, नेमबाजी इत्यादीचे शिक्षण घेतले.
* १८४० सावित्रीबाईंशी विवाह केला
* १८४७ सदाशिव गोवंडे या ब्राम्हण मित्राच्या लग्न वरातीत झालेल्या अपमानापासून सामाजोद्धाराचा वसा घेतला.
 शैक्षणिक कार्ये 
पहिली शाळा  -  ३ ऑगस्ट १८४८- पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली.
दुसरी शाळा   -  ४ मार्च १८५१- पुण्यातील बुधवार पेठेत मुलींसाठी दुसरी शाळा सुरु केली
तिसरी शाळा  - १८५२ साली पुण्यातील रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा सुरु केली.
चौथी शाळा    -  १८५२ साली वेताळ पेठेत मुलींसाठी चौथी शाळा सुरु केली.

१८५२ साली अस्पृश्य समाजातील मुलांना शिक्षण देणारी शाळा सुरु केली.
 - या त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल मे. कण्डी यांच्या हस्ते विश्रामबाग येथे १८५२ साली सत्कार करण्यात आला.
१८५३ - मंडळी नावाची संस्था काढली. हि संस्था महार मांग  समाजातील लोकांना शिक्षण देण्याचे कार्य करत होती
१८५४ - स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी केली
१८५५ - प्रौढांसाठी रात्र शाळा सुरु केल्या, तृतीयरत्न हे नाटक लिहिले (शूद्रांच्या दयनीय स्थितीचे दर्शन घडविणारे नाटक)
१८५६ - म. फुलेंवर समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केला.
१८६३ - 'बालहत्या प्रतिबंधकगृहा'ची स्थापना केली
१८६४ - गोखले बाग येथे पहिला पुनर्विवाह घडवून आणला
१८६५ - 'विधवा केशवपन प्रथे'च्या विरोधात तळेगाव येथे नाभिकांचा संप घडवून आणला



3 comments: