Showing posts with label डॉ. बाबासाहेब आंबेडकर. Show all posts
Showing posts with label डॉ. बाबासाहेब आंबेडकर. Show all posts

Saturday, November 10, 2012

डॉ. बाबासाहेब उर्फ भीमराव रामजी आंबेडकर

Dr. Babasaheb alias Bhimrav Ramji Ambedkar 

 डॉ. बाबासाहेब उर्फ भीमराव रामजी आंबेडकर

 

Dr. Babasaheb Ambedkar
Babasaheb Ambedkar
Birth Date - 14 April 1891
Birth Place - Mahu  (Madhya Pradesh)
Original Surname - Ambavade (Ratnagiri)
Death  - 6 December 1956
समाधी - चैत्यभूमी, दादर (मुंबई)


प्राथमिक शिक्षण रत्नागिरी येथे झाले
माध्यमिक शिक्षण सातारा आणि मुंबई येथे झाले

महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे झाले

घटनाक्रम -

* १९०६ - रमाबाईशी लग्न झाले
* १९०७ - मेट्रिक परीक्षा पास
* १९१३ -प्राचीन भारतातील व्यापार (Ancient India Commerce) हा प्रबंध सादर करून कोलंबिया विद्यापीठाची   M.A. डिग्री संपादन केली. यासाठी त्यांना सयाजीराव गायकवाड यांचे आर्थिक पाठबळ मिळाले.
* १९१६ - भारताचा राष्ट्रीय नफ्यातील वाटा (National Dividend of India) हा प्रबंध सादर करून कोलंबिया विद्यापीठाची पी. एच.डी.  मिळवली. यावेळी सयाजीराव गायकवाड यांचेच आर्थिक पाठबळ मिळाले.
* १९१६ - Cast in India - हा ग्रंथ लिहिला.
* १९१८-१९२० - मुंबईतील सिडनेहॅम महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्य केले. वाणिज्य आणि अर्थशास्त्राचे ते प्राध्यापक होते.
* १९२० - ३१ जाने. रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या मदतीने मूकनायक हे पाक्षिक सुरु केले.
* १९२०  - शाहू महाराजांच्या आर्थिक पाठबळाने इंग्लंडला कायद्याच्या अभ्यासासाठी गेले.
* १९२० - माणगावच्या अस्पृश्यांच्या परिषदेचे अध्यक्षपद भूषविले
* १९२३ - "पैशाचा यक्षप्रश्न" हा शोध प्रबंध लिहून  Bar At Law ची पदवी मिळविली (लंडन)
* १९२४ - २० जुलै रोजी "बहिष्कृत हितकारिणी सभा" स्थापन केली.
* १९२६ - मुंबई कायदे मंडळाच्या सदस्यपदी नेमणूक (१९२६-१९३६)
* १९२७ - ३ एप्रिल रोजी 'बहिष्कृत भारत' हे पाक्षिक सुरु केले. याच वर्षी 'समता' हे वृत्तपत्र सुरु केले.
* १९२७ - २० मार्च रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला. (१९३७ साली हे तळे सर्वांसाठी खुले करण्यात आले )
* १९२७ - २५ डिसेंबर रोजी महाड येथे मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.
* १९२७ - महाड येथे अस्पृश्य परिषद भरवली
* १९२७ - 'समता समाज संघा'ची स्थापना केली
* १९२८ - सायमन कमिशनसमोर साक्ष
* १९३० -  नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह घडवून आणला. १९३५ साली हे मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात आले.
* १९३० ते १९३३ दरम्यानच्या तिन्ही गोलमेज परिषदेत अस्पृशांचे नेतृत्व
* १९३२ - २४ सप्टेम्बर रोजी म. गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला यालाच येरवडा करार असेही म्हणतात.
* १९३५ - पहिल्या पत्नी रमाबाई यांचे निधन झाले.
* १९३६ - 'स्वतंत्र मजूर पक्षा' ची स्थापना केली.(१९३७ च्या प्रांतिक निवडणुकीत या पक्षाने १५ जागा जिंकल्या.)
* १९४२ - आप्पा दुराई यांच्या मदतीने नागपुर येथे 'अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन' ची स्थापना केली.
* १९४६ - मुंबई येथे 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी' आणि 'सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स' ची स्थापना केली
            - 'मिलिंद महाविद्यालय' औरंगाबाद येथे सुरु केले
* १९४७ - स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री बनले. २९ ऑगस्टला भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली
* १९४८ - डॉ. शारदा कबीर उर्फ माई यांच्याशी १५ एप्रिल १९४८ रोजी दिल्ली येथे विवाह झाला.
             - हिंदू कोड बील संसदेत मांडले पण विरोध झाल्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
* १९५६ - दिनांक १४ ऑक्टोबर रोजी नागपूर (दीक्षाभूमी) येथे हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
* ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले
* बाबासाहेब आंबेडकर यांची समाधी चैत्यभूमी, दादर (मुंबई) येथे आहे. 

इतर महत्वाचे-
बाबासाहेबांच्या प्रिंटींग प्रेस चे नाव 'भारत प्रिंटींग प्रेस' होते.
'रानडे, गांधी आणि जीना'  हे पुस्तक त्यांनी लिहिले.
नागपूर येथे रिपब्लिकन पक्षाची घोषणा केली (स्थापना - १९५८-  एन शिवराज) 
१९९१ - साली भारत सरकारचा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार - (१९९१ हे वर्ष सामाजिक न्याय वर्ष म्हणून पाळण्यात आले)
"शिका, संघटीत व्हा आणि लढा" हा संदेश तरुणांना दिला.
************************************************************************

ठळक अक्षरातील माहिती परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहे.